कामाची गोष्ट ! अचानक ‘गॅस’ संपलाय मग ‘नो-टेन्शन’, ‘इथं’ उपलब्ध होईल तात्काळ ‘सिलेंडर’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीच्या दरम्यान स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलेंडरची कमतरता भासत असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. परंतू यामुळे तुमच्या सणातील आनंद आता कमी होणार नाही कारण, सरकारी ऑइल मार्केटिंग कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, IOC आणि BPCL चा 5 किलोग्रॅमचा सिलेंडर तुम्ही घेऊ शकतात. या तिन्ही कंपन्यांनी या संबंधित माहिती आपल्या वेबसाइवर कळवली आहे.

25 रुपयात मागवा सिलेंडर
BPCL च्या वेबसाइट नुसार 1800224344 या वर संपर्क साधून तुम्ही तुमच्या घरी कोणत्याही समस्येशिवाय एक मिनी भारत गॅसचा 5 किलोचा सिलेंडर मागवू शकतात. दोन तासात तुम्ही हा सिलेंडर 25 रुपये वितरण शुल्क देऊन मिळवू शकतात. या सेवाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला पीओआय म्हणजेच तुमचे ओळखपत्र उपलब्ध करुन द्यावे लागेल.

कुठून मिळेल 5 किलोचा सिलेंडर
त्यासाठी ग्राहकांला आपल्या जवळच्या गॅस वितरकाशी किंवा एलपीजी रिटेल आऊटलेट, काही किराणा स्टोअर्स आणि काही पॉइंट ऑफ सेल वर जावे लागेल. या सिलेंडरचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अगदी छोटीशी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुमच्याकडे आयडी प्रूफ आणि अ‍ॅड्रेसप्रूफ सोबत बाळगावे लागेल. BIS सर्टिफाइड असल्याने हे सिलेंडर पूर्णता सुरक्षित आहेत. याची किंमत मात्र विविध ठिकाणी वेगवेगळी असेल.

या वेळेत करा बुक
या प्रकारे BPCL ची भारत गॅस सर्विस मिनी सिलेंडर असलेल्या 5 किलोचा सिलेंडर तुम्हाला देईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान संपर्क साधावा लागेल. ऑर्डर बुक झाल्यानंतर 2 तासात सिलेंडर ग्राहकांच्या घरी पोहचवण्यात येईल. ही माहिती तुम्हाला भारत गॅसच्या https://www.bharatpetroleum.com/hindi/index.aspx या वेबसाइटवर मिळेल. त्यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र दाखवावे लागेल. सिलेंडरचे शुल्क द्यावे लागेल. यानंतर 5 किलोचा मिनी गॅस सिलेंडर तुम्हाला देण्यात येईल.

HPCL च्या मते घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारात घेऊन हा सिलेंडर तयार करण्यात आला आहे. या सुविधेसाठी कोणतेही अ‍ॅड्रेसप्रूफ देण्याची ग्राहकांना गरज भासणार नाही.

– सिलेंडर संपल्यानंतर ग्राहक कोणत्याही वितरकाकडे, रिटेल आउटलेटमध्ये जाऊन निश्चित दराला पुन्हा गॅस भरुन घेऊ शकतो.

– तुमच्या जवळच्या वितरकांची माहिती तुम्हाला कंपनीच्या www.hindustanpetroleum.com या वेबसाइटवर मिळेल. याआधी इंडियन ऑइलने देखील अशी सेवा सुरु केली होती.

Visit : Policenama.com