धक्कादायक ! हिंदुस्तानी भाऊला ISI कडून जीवे मारण्याची धमकी

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 मुळं हिट झालेला हिंदुस्तानी भाऊ गेल्या काही दिवसांपसून कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत आहे. अलीकडेच त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. खुद्द त्यानंच याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

हिंदुस्तानी भाऊनं ट्विट केलंय की, “आयएसआयच्या लेफ्टनंट कर्नलनं मला जीवे मारण्याची धमकी दिलीय. आमचे लोक तुझ्या शहरात पोहोचले आहेत असंही तो म्हणाला आहे. हे नंबर आहेत ज्या नंबर वरून धमक्या मिळत आहेत. माझ्याकडे या कॉलचे संपूर्ण रेकॉर्डिंग आहेत.” असंही त्यानं सांगितलं आहे.

https://twitter.com/RealKingbhau/status/1277982902895050755

या ट्विटमध्ये हिंदुस्तानी भाऊनं फोन नंबर शेअर केलेत याशिवाय त्यानं पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या ट्विटमध्ये टॅग केलं आहे.

अनुष्का शर्माच्या बुलबुल वेब सीरिजवर आक्षेप

अलीकडेच हिंदुस्तानी भाऊनं वेब सीरिजमधील काही आक्षेपार्ह दृश्यांवर आक्षेप घेत एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात एफआयआर दाखल केली होती. आता त्यानं अनुष्का शर्माच्या बुलबुल वेब सीरिजवरही आक्षेप घेतला आहे. यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यानं केला आहे.