Hindustani Bhau | नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’चा एल्गार; म्हणाले – ‘कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Hindustani Bhau | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. यातच राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर वारंवार आरोप केले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही जोरदार आरोप केला. तसेच, मलिकांनी भाजपा (BJP) युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर 1100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभुमीवर आता सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे हिंदुस्तानी भाऊने (Hindustani Bhau) उडी घेतली आहे.

 

मलिकांनी (Nawab Malik) मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर 1100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.
तसेच आर्यन खान अपहरण आणि वसुलीचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा दावा मलिकांनी केला.
यानंतर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
दरम्यान, हिंदुस्तानी भाऊने (Hindustani Bhau) मोहित कंबोज यांच्या पाठिंब्यासाठी व्हिडीओ तयार केला आहे.
त्या व्हिडिओतुन असं सांगण्यात येत आहे की, मोहित कंबोज तुम्ही खूप चांगले काम करत आहात.
तुम्ही नशेडी, गंजेडी लोकांविरोधात तुम्ही जे आंदोलन उभं केले आहे.
जे पाऊल उचललं आहे त्याच्या सपोर्टसाठी मी तुमच्यासोबत आहे.
तुम्ही जेव्हा कधीही तुम्ही बोलावल मी प्रत्येकवेळी हजर असेन, असं हिंदुस्तानी भाऊने म्हटले आहे.

 

कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?

 

हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) म्हणजे विकास जयराम पाठक (Vikas Jayaram Pathak) हा जन्माने मुंबईकर आहे.
तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता.
या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचे परत ‘हिंदुस्तानी भाऊ’ नाव प्रसिद्ध झाले.
दरम्यान, देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांना ‘हिंदुस्तानी भाऊ’ त्याच्या शैलीत फिरकी घेतो.
भाऊचे टिकटॉकवर 6 लाखाहून अधिक फॉलोअर्स होते, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
रोखठोक आणि बेधडक भूमिकेसाठी हिंदुस्तानी भाऊची तरुणाईमध्ये एक क्रेझ आहे.

 

Web Title : Hindustani Bhau | i will support you bjp mohit kamboj says hindustani bhau over ncp leader nawab malik controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Madhuri Dixit | माधुरी दिक्षीतच्या मुलाचे लांब-घनदाट केस पाहून मुलीही लाजतील! ‘या’ कारणामुळे कापावी लागली वेणी

Pune News | विहीरीत पडलेल्या 42 वर्षाच्या महिलेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण, पुण्याच्या सोमवार पेठेतील घटना

RBI Rules | बँकेने फाटलेल्या, झिजलेल्या नोटा बदलण्यास दिला नकार तर होऊ शकते कारवाई, जाणून घ्या नियम