हिंदुत्व मानतात ते भाजपच्या सोबत येतील : देवेंद्र फडणवीस

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – युतीसाठी आम्ही कोणापुढे लाचार नाही, जे येतील त्यांच्या सोबत जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय पुढे जाऊ. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जालना येथे आयोजित राज्य कार्यकारिणीच्या बैठकी दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती बाबतच्या या वक्तव्यामुळे शिवसेना भाजपा युती होणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आज (दि.28) जालना येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना संबोधतांना आगामी निवडणुकांमध्ये युती होणार की नाही याची काळजी तुम्ही करू नका, तुम्ही जोमाने कामाला लागा. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इतकेच नव्हे तर, युतीसाठी आम्ही कोणापुढे लाचार नाहीत, जे हिंदुत्व मानतात ते भाजपच्या सोबत येतीलच असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, शिवसेनेसोबत युती केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दुर ठेवता येणार आहे. युतीसाठी आम्ही पुर्वीपासूनच सकारत्मक आहोत. परंतु, युती न झाल्यासही आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 60 वर्षांमध्ये जेवढे खड्डे खोदले आहे. ते भरण्याचे काम आम्ही पाच वर्षात केले. आणि पुढे ही करणार आहोत. 2008 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने केवळ 6 हजार कोंटीची कर्जमाफी दिली होती. परंतु, ती नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळाली. याच्या याद्या त्यांनी सादर कराव्यात. असे आवाहन करुन आम्ही दिलेली कर्जमाफी 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. आणि त्याचा तंतोतंत हिशोब आमच्याकडे आहे. जलयुक्त शिवारमुळे भूजल पातळी वाढून दुष्काळावर मात करण्यासाठी ही योजना यशस्वी झाली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुष्काळासाठी मोठी मदत मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मन ढोबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, पकंजा मुंढे, बबनराव लोणीकर, गिरीष बापट, विनोद तावडे, विजया राहटकर, सुधीर मुनगुंटीवर, सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती.

जयंत पाटील, मी चांगलं काम करतो म्हणून इतका दुस्वास करता का ?
|शिवसेनेच्या ‘या’ कार्यकर्त्याने मागितली खंडणी