हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत पेटवणाऱ्या नगराळेचा कारागृहात फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जाळून मारणाऱ्या विकेश नगराळे (वय २७) याने येथील कारागृहात फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सोमवारी घडल्याचे सांगितले जाते. मात्र, नागपूर कारागृह प्रशासनाने या बाबीचा इन्कार केला आहे.

विकेश नगराळे याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणावरुन त्याला नागपूरला हलविले असून कारागृहातील अंडा सेलमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. विकेशने सोमवारी फाशी लावण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने हा प्रकार तेथे असलेल्या गस्तीवरील पोलिसांना तातडीने लक्षात आला. त्यांनी त्याला वाचविले. नागपूर कारागृह प्रशासनाने वर्धा येथील अधिकारी तसेच तपास अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली आहे. मात्र, त्याबाबत कोणीही अधिकृतपणे काहीही सांगण्यास तयार नाही.