हिंगणघाट जळीत प्रकरण : जनतेचा ‘आक्रमक’पणा पाहून पोलिसांनी आरोपीला सकाळी 6 वाजता केलं कोर्टात हजर

हिंगणघाट : पोलीसनामा ऑनलाईन हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याला आज पहाटेच न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी कोठडीचा हक्क अबाधीत ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य करत त्याची कारागृहात रवानगी केली.

विकेश ऊर्फ विकी नगराळे (वय २७, रा़ दारोडा) याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते. यावेळी न्यायालयाच्या परिसरात मोठा जनसमुदाय जमण्याची शक्यता होती. त्यातून जनआक्रोश भडकून त्यात आरोपीच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असता. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाला पहाटे विनंती केली.

त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डफळे यांच्या न्यायालयात पहाटे ५ वाजताच हजर केले. पोलिसांनी पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली. त्यानंतर कोणाला काही समजण्याच्या आत त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.