हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – Hingoli Accident News | हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मार्गावरील आंबा चौंडी फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री रुग्णवाहिका आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर रुग्णवाहिका चालकासह 6 जण गंभीर जख्मी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हिंगोली पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. (Hingoli Accident News)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हिंगोली तालुक्यातील राहुली बु. येथील राघोजी मारोती डोरले यांना नांदेड येथे उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय रुग्णवाहिका (जी टी 18 बी टी 4773) यामधून घेऊन जात होते. यादरम्यान सोमवारी मध्यरात्री वसमत औंढा नागनाथ मार्गावरील आंबा चौंडी फाट्याजवळ रुग्णवाहिका व ट्रक ( क्र एम एच 26 ऐडी 7272 ) यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. या आपघातात कलावती राघोजी डोरले (वय 45 ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नांदेड येथे उपचारादरम्यान राघोजी मारोती डोरले ( 51) यांचा आज रोजी पहाटे मृत्यू झाला. (Hingoli Accident News)
या भीषण अपघातात रूग्णवाहिका चालक अक्षय साळवे रा वसई, तानाजी राघोजी डोरले वय 26,
नागोराव बळीराम डोरले 22, गणेश संतोष शिंदे वय 18, सचिन नामदेव डोरले वय 24, सर्व रा राहुली बु., मुंजाजी
आनंदराव मोधे वय 36, रा फुलधाबा ता औढा हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, तुकाराम आम्ले,
संतोष पटवे,बालाजी जोगदंड, गजानन भोपे हे घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेद्वारे नांदेड येथे रवाना केले आहे.
पतीला उपचारासाठी नेत असताना पत्नीवरदेखील काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Hingoli Accident News | ambulance accident while taking husband for treatment couple dies on the spot 6 injured
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update