Hingoli Accident News | नोकरीच्या पहिल्याच दिवशी घरी परतताना झालेल्या अपघातात 2 चुलतभाऊ ठार

0
161
Hingoli Accident News | both cousins were killed on the spot in accident in Hingoli district
file photo

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Hingoli Accident News | नोकरीच्या पहिल्याच दिवशी काम करून घरी परतत असताना हिंगोली- सेनगाव मार्गावरील काळकोंडी पाटीजवळ उभ्या आयशर टेम्पोवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दोघा चुलतभावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हि घटना शुक्रवारी रात्री घडली असून
संदीप कुंडलीक पाटोळे (वय ३२), भास्कर पांडुरंग पाटोळे (४० दोघे रा. गिलोरी) अशी मृतांची नावे आहेत. (Hingoli Accident News)

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गिलोरी (ता हिंगोली) येथील संदीप पाटोळे व त्याचा चुलत भाऊ भास्कर पाटोळे हे दोघे शुक्रवारी कामाच्या शोधात हिंगोली औद्योगिक वसाहतीमध्ये आले होते. त्यांना कामही मिळाले अन् त्यांनी एक दिवस कामही केले. त्यानंतर रात्री दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले. हिंगोली ते सेनगाव मार्गावर नर्सी नामदेव जवळ एक नादुरुस्त टेम्पो रस्त्यावरच उभा होता. हा टेम्पो न दिसल्याने त्यांची दुचाकी टेम्पोवर जाऊन आदळली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. (Hingoli Accident News)

 

अपघाताची माहिती मिळताच नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी, उपनिरीक्षक अशोक कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहेत. दरम्यान, पाटोळे कुटूंबियांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार मृत संदीप पाटोळे यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुली तर भास्कर पाटोळे यांच्या पश्च्यात आई, पत्नी दोन मुले, दोन मुली असा परिवारआहे.

 

Web Title :- Hingoli Accident News | both cousins were killed on the spot in accident in Hingoli district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! ‘या’ महत्वाच्या कागदपत्राबाबत मिळाला मोठा दिलासा

7th Pay Commission | मोठी बातमी ! महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनचा बदलला फार्म्युला! जाणून घ्या आता किती मिळेल सॅलरी

Pune Crime | 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून लज्जास्पद वर्तन; चंदननगर परिसरातील घटना