Hingoli Accident News | हिंगोलीत रेतीने भरलेला ट्रॅक्टर नदीत कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – Hingoli Accident News | हिंगोली जिल्ह्यातील वसमत नांदेड रोडवरील नदीच्या पुलावरून रेती घेऊन वसमतकडे येणारे ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुरा झाला आहे. पुलावरून ट्रॅक्टर येत असताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीत कोसळले. (Hingoli Accident News)

या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचे पार्ट इतरत्र विखुरले गेले आहेत. ते रेती घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला पोलिसांचे किंवा एखाद्या अधिकाऱ्याचे वाहन दिसले असावे त्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी त्याने ट्रॅक्टर पुलावरून नेला. यादरम्यान त्याचा वाहनावरील ताबा सुटला असावा त्यामुळे पुलावरून येताना ट्रॅक्टर नदीत कोसळला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. (Hingoli Accident News)

क्रमांक एम.एच 12 एचडी 7080 असा या अपघातग्रस्त ट्रॉलीचा नंबर आहे. राजू भागवत शिंदे (वय 32 वर्ष)
असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. तो मळरक जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात
आले आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
झाले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल काच मंडी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप यामावार हे करत आहेत.

Web Title :- Hingoli Accident News | the tractor filled with sand collapsed in the river driver died on the spot in hingoli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hasan Mushrif | राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांत गुन्हा दाखल

Devendra Fadnavis | ब्राह्मण समाज काही मागत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य – देवेंद्र फडणवीस

Pune Kasba Peth Bypoll Election | पराभव दिसत असल्याने धंगेकर सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजपचा धंगेकरांवर आरोप (व्हिडिओ)