Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2 तरुणावर काळाचा घाला

0
242
Hingoli Accident News | two youths who were preparing for police recruitment died in accident while going to exercise in the morning Hingoli news
File Photo

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Hingoli Accident News | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणावर काळाने घाला घातला आहे. हे तरुण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सकाळी भल्या पहाटे व्यायामला गेलेले असताना अज्ञात वाहनाने त्या दोघांना उडवलं व ते वाहन घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli Accident News) वसमत शहरात पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हा हादरून गेला आहे.

 

अनिल भगवानराव आमले Anil Bhagwanrao Amle (वय 24 रा.कृष्ण मंदिर, कवठा रोड, वसमत) आणि गणेश परमेश्वर गायकवाड Ganesh Parmeshwar Gaikwad (वय, 18 रा. पौर्णिमा नगर, वसमत) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोन्हीही तरुणांचे मृतदेह सकाळी सेवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी त्यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. या घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर वसमत शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर यापुढे अशा घटना घडू नये यासाठी या वीटभट्टी रोडवर ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी तेथील नागरिकांतून होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास वसमत ग्रामीण पोलीस (Wasmat Rural Police) करत आहेत.

 

Web Title :- Hingoli Accident News | two youths who were preparing for police recruitment
died in accident while going to exercise in the morning Hingoli news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा