हिंगोली : संतप्त आंदोलकांकडून आमदारांना धक्काबुक्की

हिंगोली : पोलीसनामा आॅनलाईन-

कळमनुरी तालुक्यात आंदोलनादरम्यान आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेल्या विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांना संतप्त जमावाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4826649f-918a-11e8-aab1-9db0b735a7d6′]

जमाव आक्रमक झाल्यानंतर अखेर आमदार वडकुते यांनी आंदोलनस्थळावरून काढता पाय घेतला. तर दुसरीकडे दातीपाटीवर संतप्‍त जमावाने ट्रक पेटवून दिला. तसेच साळवा पाटीवरही बाभळीचे झाड हिंगोली-नांदेड महामार्गावर आडवे पाडून महामार्ग बंद पाडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आखाडा बाळापूर येथे सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी दुपारी 12 च्या दरम्यान रास्तारोको आंदोलन सुरू केले होते. यावेळी विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी हजेरी लावून माईक ताब्यात घेतला आणि आंदोलकांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e4a337d-918a-11e8-ad1c-db5d9ee40212′]

मात्र संतप्त झालेल्या जमावाने माईक हिसकावून घेत त्यांना धक्काबुक्की केली. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेताच आमदार वडकुते यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेत निवासस्थान गाठले. संतप्‍त जमावाने आखाडा बाळापुरातील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहाची ताडफोड केली. कळमनुरी तालुक्यातील दाती फाट्यावर अज्ञात आंदोलकांनी उभा ट्रक पेटवून देण्यात आला.