८ वी पास विद्यार्थ्याचा ‘भन्नाट’ शोध ; ब्लूटूथ नको फक्त कानाला ‘बोट’ लावून मारा गप्पा

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – रोजच्या आयुष्यात जसे अन्न, वारा, निवारा या मुलभूत गरजा आहेत, त्यात नवीन गरज म्हणजे मोबाईल आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण मोबाईल न वापरणारी क्वचितच एखादी व्यक्ती मिळेल. मोबाईल लागतो कशाल तर फक्त फोनवर बोलायला नाही तर फोटो, गाणी, चित्रपट अशी अनेक कारणे आहेत.

मग मोबाईल पाठोपाठ त्यासोबत हेडफोनस् स्पीकर अशा अनेक गोष्टी येतात. त्यात फोनसाठी ऑडिओ ब्लूटूथ पण आहेत. अशी अनेक नवनवीन उपकरणे बाजारात येत असतात. त्यावर ‘स्पीकर व्हेव’च्या माध्यामातून हिंगोलीतील एका आठवी पास तरूणाने भन्नाट शोध लावला आहे. फक्त बोट कानाला लावून आपण समोरील व्यक्तीशी मोबाईलवरून संवाद साधू शकतो. हे ऐकूण नवल वाटत असेल ना, पण हो असाच शोध या पठ्ठ्याने लावला आहे.

या मुलाचे नाव रवी क्षीरसागर असं आहे. रवी फक्त आठवी पास नाही तर ध्येयवेडा तरुण ड्रायव्हर आहे. तो कामाच्या शोधात जालना जिल्ह्यातून हिंगोलीत आला. तेथे राहिला. रवीने एक अनोखे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र एका हाताला घड्याळा सारख घालायचे, आणि ते ब्लुटूथच्या माध्यामातून फोनशी जोडायचं. कोणाचा फोन आला की हाताचे कोणतंही बोट कानाला लावून फोनवर बोलायला सुरुवात करायची.

हे यंत्र बनवण्यासाठी रवीने ब्लूटूथ किट, ऑडियो बोल्ड, बॅटरी आणि कॉईल या चार वस्तूंचा वापर केला आहे. शरीराच्या नसमधून ऑडिओ लहरी स्पीकर होऊन बोटातून कानापर्यंत पोहचतात, असा दावा रवी क्षीरसागरने केला आहे. त्याने बनवलेले हे यंत्र सध्या प्राथमिक स्वरुपाचे आहे. हे यंत्र मोबाईल चार्जरने चार्ज करता येते. तसंच चार्जींग केल्यावर ते दोन तास चालते.

दरम्यान, कानाला बोट लावून बोलणे हे खरच शक्य आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञ मंडळींनी हे संशोधन अद्याप पाहिले नाहीये, मात्र जर असं होणार असेल तर भविष्यात फक्त कानाला बोट लावूनच बोलता येईल. परंतू असं अशक्य आहे, असं संशोधनातून निष्पन्न झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

You might also like