Post_Banner_Top

आता केवळ बोट कानाला लावून बोला, या ८ वी पास पठ्ठ्याने लावला भन्नाट शोध

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – हातात मोबाईल फोन आणि गाडी चालवत कसरत करताना अनेकजण दिसतात. परंतु त्याला उपाय म्हणून अनेकजण हेडफोन, ब्लूटुथ हेडफोन वापरतात. मात्र आता त्याचीही गरज नाही. कारण आता आपण केवळ कानाला हात लावून फोनवर संभाषण करु शकतो. हिंगोलीतील एका ८ वी पास असलेल्या तरुणाने स्पीकर वेव्ह च्या माध्यमातून हा अफलातून शोध लावला आहे.

कोण आहे शोध लावणारा अवलिया ?

रवी क्षीरसागर असे हा अफलातून शोध लावणारा अवलिया आहे. त्याने स्पीकर वेव्हच्या माध्यमातून हा भन्नाट शोध लावला आहे. रवी क्षीरसागर हा मुळचा जालना जिल्ह्यातील आहे. तो कामाच्या शोधात हिंगोलीत आला असून सध्या ड्रायव्हरचे काम करत आहे.

असं आहे यंत्र

रवी क्षीरसागरने यासाठी एक यंत्र तयार केलं आहे. हे यंत्र घड्याळासारखं असून यात मोबाईलला ब्लूटुथच्या माध्यमातून कनेक्ट करून तुम्ही कोणतंही बोट कानाला लावून संभाषण करू शकता.

आरोग्य विषयक वृत्त –

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

Loading...
You might also like