हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Hingoli Crime | एका सासऱ्याने आपल्या सुनेचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना (Hingoli Crime) उघडकीस आली आहे. नात्याला काळिमा फासणारी ही घटना हिंगोली जिल्ह्याच्या (Hingoli) सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडली. आरोपी सासऱ्याने सून घरात असताना दरवाजा बंद करून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सुनेनं सासऱ्याविरोधात नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात (Narsi Namdev Police Station) तक्रार दिली आहे. यावरुन पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, आरोपी हा सेनगाव तालुक्यातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी 4 डिसेंबर रोजी आरोपी सासरा घरी असताना, त्याची सून घरी आली होती. यावेळी सासऱ्याने आपल्या सुनेशी वाद घातला. ‘आमच्या डब्यातील सगळी डाळ तू घेऊन गेलीस’ असा आरोप सासऱ्याने आपल्या सुनेवर केला.
त्यानंतर डब्यात डाळ आहे का बघ म्हणत आरोपी सासऱ्याने सुनेला घरात पाठवलं. यावेळी सून घरात गेली असताना अचानक सासऱ्याने घराचा दरवाजा बंद करून घेतला. यानंतर सासऱ्याने सुनेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनेनं आरडाओरड केली असता सुनेचे आई वडील घरात धावून आले. तेव्हा सासऱ्याने त्यांनाही अश्लील शब्दांत शिवीगाळ करत जीवे मारण्याची (Hingoli Crime) धमकी दिली.
दरम्यान, 5 डिसेंबर रोजी पीडित सुनेनं नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात (Narsi Namdev Police Station) जाऊन सासर्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी विनयभंगासह इतर कलमा अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Web Title :- Hingoli Crime | father in law closed door and molest daughter in law in hingoli fir lodged in narsi namdev police station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | खूशखबर ! लग्नसराईतही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव