Hingoli Crime | पतीनेच मित्राला करायला लावला पत्नीवर बलात्कार; हिंगोलीत धक्कादायक प्रकार

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Hingoli Crime | जिल्ह्यातील सवड येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीनेच मित्राला आपल्या पत्नीवर बलात्कार (Rape in Hingoli) करायला लावल्याची घटना समोर आली आहे. पीडिता घरी एकटी असल्याचे पाहून पतीने मित्राला घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करायला लावला. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात (Hingoli Gramin Police Station) पीडितेने फिर्याद दिल्यानंतर पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Hingoli Crime)

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री पीडिता घरी एकटी होती. रात्री १० च्या सुमारास पीडितेचा पती आपला मित्र माधव जोगदंड याला घरी घेऊन आला. त्यानंतर पती घराच्या बाहेर पहारा देण्यास गेला तर मित्राला पत्नीवर अत्याचार करण्यास सांगितले. (Hingoli Crime)

 

मैत्रीला काळिमा फासत मित्राने देखील मित्राच्या पत्नीला आणि तिच्या मुलीला चाकुचा धाक दाखवून जबरी अत्याचार केला आहे. या धक्कादायक घडल्यानंतर पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान आरोपी पतीने चारित्र्यावर संशय घेत अनेकदा मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. त्यानंतर पटीने हद्दपार करत मित्राकरवी बलात्कार घडवून आणला. पोलिसांनी या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणालाही अटक केली नाही.

 

Web Title :- Hingoli Crime | husband forced friend to rape his wife crime in hingoli fir lodged

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anushka Sharma | ‘या’ चित्रपटात अनुष्का शर्माने तिचे लिपलॉक केले होते जोरदार, इंटिमेट सीन्स दिल्यानं उडाली होती प्रचंड खळबळ

 

LIC Aadhaar Shila Plan | महिलांसाठी LIC ची मस्त पॉलिसी ! कमी गुंतवणुक करा अन् मिळवा लाखोंचा लाभ; जाणून घ्या

 

Rani Chatterjee | ट्रोलरला राणी चॅटर्जीच्या बॉडी शेमिंगचा करावा लागला ‘सामना’, अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर