हिंगोलीच्या व्यक्तीचा सौदी आरेबियात म्रुत्यु, बनावट म्रुत्यु प्रमाणपत्र तयार केल्याने माजी नगरसेवकावर गुन्हा

हिंगोली : बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी हिंगोली येथील एका माजी नगरसेवकावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मुंतजिम शेख मौला असे प्रमुख आरोपीचे नाव आहे.
याबाबत हिंगोली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मो. हुसेन मिया आ. गफुर यांचा मृत्यू मक्का सौदी अरेबिया येथे जानेवारी २००६ मध्ये झाला होता. असे असतांनाही माजी नगरसेवक असलेला शेख मुंतजिम शेख मौला आणि इतरांनी मयताचा मृत्यू हिंगोली शहरातच झाला असल्याचे दाखवून दिनांक २१ जानेवारी २००६ रोजी मयताचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढले.

ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत आज नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक संदीप विश्वनाथ घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६८, ४७१ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.