Hingoli News । चालकाला ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आईसह 7 वर्षाचा मुलगा गेला वाहून

हिंगोली (Hingoli News) : पोलीसनामा ऑनलाइन – Hingoli News । औंढा नागनाथ तालुक्यातील (Aundha Nagnath) कोंडसी असोला येथे पावसामुळे ओढ्याला पाणी आले आहे. ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला आला नसल्याने आई आणि मुलगा पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये मात्र त्या महिलेचा पती आणि ड्रायव्हर बचावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके (पोटा) येथे रामदास शेळके (Ramdas Shelke), वर्षा योगेश पडोळ (Varsha Yogesh Padol), योगेश पडोळ (Yogesh Padol) आणि त्यांचा मुलगा श्रेयस (Shreyas) हे चोघे कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते कोंडसी असोला मार्गे औरंगाबादला निघाले होते. मात्र, रात्रीच्या दरम्यान चालकाला ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाजच लागला नाही. यामुळे गाडी अडकली, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वर्षा पडोळ आणि तिचा मुलगा श्रेयस पडोळ (वय, 7) हे दोघे ओढ्यात वाहून गेले आहेत. आणि त्या महिलेचा पती आणि चालक खाली उतरल्याने ते बचावले.

या दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, तेथील तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलीस
निरीक्षक गजानन मोरे पाण्यात वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत.
रविवारी रात्री उशीरापर्यत हे शोधकार्य सुरूच होते. या घटनेने औंढा नागनाथ (Aundha Nagnath) परिसरात शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Hingoli News. The driver did not anticipate the creek water, 7-year-old boy with his mother died

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update