हिंगोली : महिलेसोबत शारिरिक संबंध ठेवतानाचे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवले, तरुणावर FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिंगोली जिल्ह्यातून पुण्यात कामानिमित्त आलेल्या महिलेचे एका तरुणाने अब्रूचे धिंडवडे काढले आहेत. महिलेसोबत शारीरीक संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो काढून तिच्या नातेवाईकांना पाठवून समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न तरुणाने केला आहे. या प्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून तरुणावर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सागर सुनील मोरे (रा. हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. कळमनुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील (जि. हिंगोली) एक महिला काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबीयांसोबत पुण्यात कामानिमित्त आली होती. दरम्यान पुण्यात एका कंपनीत काम करताना तिची ओळख कंपनीत काम करणाऱ्या सागर या तरुणाशी झाली. ओळखीतून त्यांची मैत्री वाढत गेली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेशी शारीरिक संबंधही ठेवले आणि तिच्या परवानगीशिवाय तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर आरोपीने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पीडित महिलेच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली आहे. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सागरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी पोलीस तपास करत आहेत.