लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – एका 24 वर्षीय तरुणीवर मागील पाच ते सहा वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपींविरूद्ध वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील अमोल उर्फ गजानन मेटे याने सदर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून व ठिकठिकाणी नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी तरुणीने हट्टा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल उर्फ गजानन माणिक मेटे याच्याविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबाबत जाब विचारला असता डिगाबंर विठ्ठल मेटे रा. जवळा बाजार याने तिचा विनयभंग केल्याचा आरोपही तक्रारीत केला.

सुशिलाबाई माणिक मेटे, अश्विनी देवानंद मेटे, श्याम माणिक मेटे, तुकाराम नारायण पवार रा. जवळा बाजार यांनी फिर्यादी व साक्षीदारास अश्लील भाषेत शिवीगाळ करून जबर मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास वसमत उपविभागीय अधिकारी सतीश देशमुख हे करीत आहेत. या प्रकरणातील तिन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like