Hinjawadi Crime | एटीएम बसवण्याच्या बहाण्याने 70-80 जणांची फसवणूक, कंपनीच्या डायरेक्टरसह 3 जणांविरुद्ध FIR

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – एटीएम (ATM) बसवण्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 70 ते 80 गुंतवणूकदारांना (Investors) 10 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार हिंजवडीमध्ये (Hinjawadi Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Crime) एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2020 ते 4 सप्टेंबर 2021 या कालावधीत आदित्य शगुन मॉल, बावधन (Aditya Shagun Mall, Bawadhan) येथे घडला आहे.

मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Annadata Multi Services PVT LTD) कंपनाचे डायरेक्टर राजु भिमराव साळवे Raju Bhimrao Salve (वय-41) त्याची पत्नी ज्योती राजु साळवे Jyoti Raju Salve (वय-34 दोघे रा. रा. सर्वे नं. 134/135, आपटे कॉलनी, बिल्डींग नं. 3 फ्लॅट नं.3 वारजे माळवाडी, पुणे), कंपनीचा मॅनेजर कुमार श्रीधर गोडसे Kumar Sridhar Godse (रा. बावधन बुद्रुक, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी परमेश्वर दादाराव पाटील (वय-45 रा. कल्याण रोड, अहमदनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू साळवे तसेच त्याची पत्नी ज्योती व गोडसे यांनी तक्रारदार व
इतर गुंतवणूकदारांना एटीएम बसून देण्याचे सांगून मोबदला म्हणून जादा परताव्याचे आमिष दाखवले.
आरोपींनी तक्रारदार यांच्यासह 70-80 गुंतवणूकदारांकडून 10 लाख रुपये अमानत रक्कम (Deposit amount) घेतली.
गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडे ठेवलेल्या अमानत रकमेचा अपहार केला.
तसेच एटीएम न बसवता सर्वांची फसवणूक केली.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Web Title : Hinjawadi Crime | 70-80 people cheated under the pretext of installing ATMs, FIR against 3 people including company director

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 166 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chakan Crime | जुगार अड्यावर चाकण पोलिसांचा छापा, जागा मालकासह 10 जणांवर FIR

Rain in Maharashtra | येत्या 5 दिवसांत मुंबईसह पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, नंदुरबार वगळता पावसाची राज्यात सर्वदूर बरसणार