Hinjewadi : अनैसर्गिक शरीर संबंधास नकार दिल्याने तरुणावर चाकूने वार

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडी येथे तरुणाने पुरुषाला अनैसर्गिक शरीर संबंधास नकार दिल्याने ४० वर्षीय पुरुषाने २९ वर्षीय तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास  बेंगलोर-मुंबई सर्व्हिस रोडवर घडली आहे.याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा चिंचवड येथे राहतो तर आरोपी हा काळेवाडी परिसरात राहतो,या दोघांची ओळख जिममध्ये झाली आणि त्यांच्यात मैत्री जमली.याचेच रूपांतर अनैसर्गिक संबंधात झाले.काही दिवसांनी आरोपीचा विवाह झाला,त्यानंतर सोमवारी म्हाळुंगे येथे बेंगलोर-मुंबई सर्व्हिस रोडवर फिरायला गेले होते त्यावेळी आरोपीने फिर्यादीला अनैसर्गिक शरीर संबंधाची मागणी केली.मात्र तुझा आता विवाह झाला असून हे बरोबर नाही असं फिर्यादीने सांगितले.आरोपीला राग अनावर झाला नाही आणि त्याने फिर्यादी तरुणाच्या हाताच्या तळव्यावर चाकूने वार केले यात फिर्यादी जखमी झाला आहे.या प्रकरणी २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे.त्याचा सखोल तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.