पहिल्या ‘हिंजवडी फेस्टीवल’चा आज शुभारंभ  

हिंजवडी : पोलिसनामा ऑनलाइन – हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने सलग दोन दिवस चालणाऱ्या हिंजवडी फेस्टीवल चा शनिवार (ता 19) पासून शुभारंभ होणार असून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धडाकेबाज सखी हा सास्कृतीक व मनोरंजनाचा कार्यक्रम सांयकाळी 6 वाजता हिंजवडी येथील म्हातोबा क्रिडासंकुलात आयोजीत केला असल्याची माहीती संयोजक युवा नेते सुरेश हुलावळे, हिंजवडीचे उपसरपंच राहूल जांभूळकर व ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे यांनी दिली.

भय्यू महाराज मृत्यू प्रकरण : अश्लिल व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्याऱ्या तरुणीसह दोघांना अटक 

सुमारे पाच हजारांहून अधिक महिला सहभागी होणाऱ्या या फेस्टीवलचे उदघाटन स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या हस्ते होईल. तर बक्षीस वितरण पालकमंत्री गिरीष बापट, खासदार श्रीरंग बारणे आमदार संग्राम थोपटे, बाळा भेगडे, लक्ष्मण जगताप, मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होईल.

हिंजवडीतील महिलांकरिता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्या महिलांना तीन दुचाकी गाड्या तसेच फ्रीज, वाँशींग मशीन भेट देण्यात येणार आहे. तर हिंजवडीकरांच्या मनोरंजनासाठी चला हवा येऊ द्या. या झी वाहिनीवर होणाऱ्या कार्यक्रमामधील टीमचा मनोरंजनाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी 6 ते 10 या वेळात होणार आहे.

हिंजवडीत पहिल्यांदाच होणाऱ्या फेस्टीवलचे आयोजन युवा नेते सुरेश हुलावळे, हिंजवडीचे उपसरपंच राहूल जांभूळकर  ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष साखरे, माजी उपसरपंच प्रविण जांभूळकर शिवनाथ जांभूळकर, गणेश जांभूळकर, प्रदीप साखरे, शामराव हुलावळे, भिमाजी जांभूळकर, उत्तम जांभूळकर, सुभाष साखरे, सूर्यकांत साखरे व मनोज साखरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.