हिंजवडीत गुटखा आणि विदेशी सिगारेटचा साठा जप्त

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईन

आयटी पार्क असणाऱ्या हिंजवडी परिसरात राजरोसपणे विदेशी सिगारेट आणि गुटख्याची विक्री सुरु होती. याबाबत स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधाराने हिंजवडी पोलिसांनी मेझा ९ चौकातील एका दुकानावर छापा टाकून ४७४ बॉक्स विदेशी सिगारेट आणि देशी गुटखा जप्त केला.

जाहिरात

नथमल मदनलाल सिरवी याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईस्थित एका सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकाने मेझा ९ चौकातील सिरवी यांच्या दुकानात विदेशी सिगारेट आणि गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून हिंजवडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी याबाबत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते.

सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे आणि त्यांचा पथकाने सिरवी यांच्या दुकानात छापा टाकला. त्यावेळी ३९ हजार ५७० रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या ४७४ बॉक्स विदेशी सिगारेट आढळून आल्या. यावेळी केलेल्या अधिक तपासणीत ४३ हजार ७७ रुपये किमतीचा गुटखा आणि सेटेंड तंबाखू आढळून आली. या कारवाईबाबत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती कळविली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी