हिंजवडीत ‘आयटी’ अभियंत्याची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडी आयटी पार्क मधील टेक महिंद्रा कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणाने सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f478093-b775-11e8-91c3-bd12d6b30d14′]

विद्यासागर पाथा (२५, हिंजवडी फेज तीन, मूळ – विशाखापट्टणम) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस ठाण्यात माहिती आली. फेज तीन मध्ये राहत असलेल्या एका आयटी अभियंत्याने सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली आहे.

तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी करुन जखमी विद्यासागर याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तो टेक महिंद्रा कंपनीत काम करत होता. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी