हिंजवडीतील आयटी अभियंत्याचा बुडून मृत्यू

पिंपरी चिंचवड :पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड परिसरातील २४ वर्षीय आयटी अभियंत्याचा जिममधील स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्चर्य म्हणजे त्याने जीव रक्षक जॅकेट घातले असताना त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समजते आहे.

मृत तरुण मुळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी असून सध्या तो पुण्यातील हिंजवडी परिसरात राहतो. गट्टूपती भार्गव असे या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आयटी क्षेत्रात काम करणारया या तरुणाने वाकड येथील जिममध्ये एक महिन्यापासून जलतरण शिकण्यासाठी जात होता. गट्टूपती शुक्रवारी रात्री सराव करण्यासाठी स्विमिंग टॅंकमध्ये उतरला आणि अचानक बुडायला लागला.

आश्चर्य म्हणजे पोहताना त्याने लाईफ जॅकेट घालून सुध्दा तो बुडाला. गट्टूपती बुडाल्यानंतर जिमच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी लगेचच गट्टूपतीला पाण्याबाहेर काढले पण तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत. गट्टूपती हिंजवडी येथील कॉग्नीझंट कंपनीमध्ये नोकरी करीत होता. पोलिसांनी ही माहिती त्याच्या नातेवाईकांना कळवली आहे.

You might also like