मित्रच पत्नीशी ‘लगट’ करत असल्याचं ‘जाणवलं’, मग त्यानं ‘स्केटिंग’ प्रशिक्षकालाच ‘संपवलं’

हिंजवडी पोलिसांनी केली आरोपीस अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीच्या मोबाईलवर वारंवार संदेश पाठवत असल्याने चिडून स्केटिंग प्रशिक्षकाचा खून केल्याची कबुली अटक आरोपीने दिली. हा खून मारुंजीत बुधवारी सकाळी उघडकीस आला होता.

विठ्ठल मानमोडे (32) याला अटक केली आहे. तर निलेश नाईक (24) अस प्रशिक्षकाचे नाव होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश पुण्यातील गोखलेनगर येथे स्केटिंगचे प्रशिक्षण द्यायचा. निलेश सुसगाव येथील ज्या सोसायटीत राहतो तिथंच विठ्ठलही राहायला असल्याने त्यांची मैत्री झाली होती. निलेशचं विठ्ठलच्या घरी येणं-जाणं व्हायचं. याच ओळखीतून विठ्ठलच्या पत्नीचा मोबाईल नंबर निलेशकडे आला होता. याच दरम्यान विठ्ठलवर एक गुन्हा दाखल झाला. पोलीस त्याच्या मागावर असल्याने तो काही दिवस बाहेर अन काही दिवस घरी असायचा.

अशातच एकट्या पडलेल्या विठ्ठलच्या पत्नीशी जवळीक निर्माण करु लागला. तो विठ्ठलच्या पत्नीला वारंवार मेसेज पाठवत होता. ही बाब विठ्ठलला समजली अन त्याने निलेशचा काटा काढण्याचं ठरवले. यासाठी मंगळवारी रात्री विठ्ठलने पार्टीचा बेत आखला. निलेश आणि एका साथीदाराला घेऊन तो मारुंजी येथील निर्जनस्थळी आला. तिथंच तिघे रात्रभर दारू प्यायले नशेत असतानाच सोबत आणलेल्या कोयत्याने साथीदाराच्या मदतीने विठ्ठल मानमोडेने निलेशचा गळा कापला.

घटनेनंतर आरोपी पसार झाले. हिंजवडी पोलिसांनी विठ्ठलची माहिती मिळाली. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त मोहिते, वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारे, अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, कर्मचारी कुणाल शिंदे यांच्या पथकाने नवी मुंबई येथून त्याला अटक केली, तर साथीदार अद्याप ही फरार आहे.

Visit : Policenama.com