अलिशान गाड्या चोरणाऱ्यास हिंजवडी पोलिसांकडून अटक

पुणे (हिंजवडी) : पोलीसानामा ऑनलाइन – महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात अलिशान गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चोरीची फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आली आहे. वसिम कासिम सय्यद (वय-32 रा. गुगल हौसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातून अलिशान गाड्या चोल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Car
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसिम सय्यद याने हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 21 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान फॉर्च्युनर गाडी चोरून नेली होती. या प्रकरणी विकास दारासिंग परदेशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या वर्णनानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता आरोपी गोव्यातील असल्याची माहिती समोर आली. हिंजवडी पोलिसांनी गोव्यात जाऊन आरोपीचा शोध घेतला. त्याच्याकडून एक फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात कार चोरीचे गुन्हे असल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी हे बावधन येथील कोठारी टोयोटा सर्व्हिस सेंटरमध्ये डिलिव्हिरी बॉयचे काम करतात. घटनेच्या दिवशी सर्व्हिसींग सेंटरमध्ये सर्व्हिसींगसाठी आलेली फॉर्च्युनर कार ग्राहकाच्या घरी सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना सर्व्हिस सेंटर ते मधुबन हॉटेल दरम्यान गाठले. हे हमारी कंपनी की गाडी है, मै लेने आया हूँ, इसे मै ले जाता हूँ असे म्हणून फिर्यादी यांचा विश्वास संपादीत करून त्यांना 7 हजार रुपये देऊन गाडी घेऊन फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ -2 चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी अनुरुद्ध गिजे, एम.डी. वरुडे, सहायक पोलीस फौजदार वायबसे, पोलीस हवालदार, बाळु शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, पोलीस नाईक आतिक शेख, कुमाल शिंदे, विवेक गायकवाड, पोलीस शिपाई सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, रितेश कोळी, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com