Hinjewadi-Shivajinagar Metro | प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मिळाला ‘मुहूर्त’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या आणि मागील काही वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (Hinjewadi-Shivajinagar Metro) प्रकल्पाच्या प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी मुहूर्त ठरला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो (Hinjewadi-Shivajinagar Metro) प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी नवरात्रीचा (Navratri) मुहूर्त काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

देशातील सर्वात मोठे आयटी पार्क (IT Park) म्हणून हिंजवडीची ओळख आहे. ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण 165 कंपन्या आहेत. या ठिकाणी लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आयटी पार्कमुळे या भागात वाहतुक कोंडी (Traffic jam) होऊन कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातो. या पार्श्वभूमीवर PMRDA ने हिंजवडी ते शिवाजीनगर (Hinjewadi-Shivajinagar Metro) हा मेट्रो प्रकल्प (Metro project) हाती घेतला आहे. यामुळे हिंजवडीत होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. राज्य सरकारने 18 जुलै 2018 रोजी या प्रकल्पास महत्त्वकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केले आहे.

10 ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित
भूसंपादनासह विविध तांत्रिक अडचणी दूर झाल्याने या प्रकल्पाच्या कामासाठी 10 ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष काम सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र पाठवून वेळ मागण्यात आली असल्याचे PMRDA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

3 वर्षे 4 महिन्यात काम पूर्ण होणार
या प्रकल्पाचे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. 24 किमी मेट्रो लाईन तयार करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागतो. परंतु हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प तीन वर्षे चार महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठरलेल्या मुदतीत हे पूर्ण करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे.

 

प्रकल्पाची वैशिष्टे

24 किमीचा मार्ग, 23 स्थानके

संपूर्ण मेट्रो इलेव्हेटेड

एकूण किंमत 8 हजार 313 कोटी

भूसंपादनासाठी 1 हजार 811 कोटीचा खर्च

टाटा, सिमेन्सची 5 हजार कोटींची गुंतवणूक

केंद्र व राज्य सरकार 3 हजार कोटींचा निधी देणार

राज्य सरकार जमिनीच्या स्वरुपात निधी उपलब्ध करुन देणार

मेट्रो मार्गातील स्थानके
हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, यशदा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, आरबीआय बँक, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर न्यायालय

Web Title :- Hinjewadi-Shivajinagar Metro | Hinjewadi-Shivajinagar metro gets moment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘…अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही’

Kirit Somaiya | हसन मुश्रीफांना कुणीही वाचवू शकणार नाही – किरीट सोमय्या

Pune Police | गुन्हे शाखेचा शहरात रिक्षाचालकांविरोधात ‘ड्राईव्ह’, अनेक रिक्षाचालकांवर कारवाई