हिंजवडीत वाहतूक पोलिसाला मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

चौकातील ‘झेब्रा क्रॉस’वर उभा असलेली कार पाठीमागे घ्यायला सांगितली म्हणून चालकाने वाहतूक पोलिसाला अपशब्द वापरून धक्काबुकी केल्याचा प्रकार ताजा असतानाच हिंजवडी शिवाजी चौकात दुसरा प्रकार घडला आहे. हेल्मेट आणि वाहन परवाना मागितला म्हणून पोलीस हवालदारास मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार नुकताच घडला आहे.

[amazon_link asins=’B0783HZ6LZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5219a061-8be6-11e8-abc7-4bd968ce0fe1′]

या प्रकरणी हिंजवडी वाहतूक शाखेचे पोलीस कारकुड यांनी फिर्याद दिली आहे. तर प्रशांत सयाजी जांभुळकर, संदेश उत्तम कदम, ऋषभ संजय जळके आणि अक्षय गावडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारकुड हे रात्रीच्या सुमारास शिवाजी चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. दरम्यान विना हेल्मेट दुचाकीवर आलेल्यांना त्यांनी वाहन परवाना मागितला. यावरून त्यांच्यात वादावाद झाली. त्याने आपल्या इतर साथीदारांना तिथे बोलावले. पोलीस हवालदारांची गचंडी पकडून मारहाण करण्यात आली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला.

दरम्यान भूमकर चौकात पोलिस हवालदार जयराम सावळकर यांना धक्काबुकी केल्याचा प्रकार ताजा आहे.  राजेश वसंत मोगल (३४, रा. पौड रोड, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.  वाहतूक पोलिसांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना धक्काबुकी, मारहाण, शिवीगाळ असे प्रकार वारंवार होत आहेत.