शिवाजी चौकातील बदलामुळे हिंजवडीत प्रचंड वाहतूक कोंडी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

हिंजवडी येथील शिवाजी चौकात वाकडहुन फेज दोन, मारुंजी कडे जाणारा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. या बदलामुळे शिवाजी चौक ते वाकड भुजबळ ब्रिज प्रयत्न वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अचानक झालेल्या बदलामुळे आयटीकरांना चांगलाच त्रास होत आहे. तासनतास भरपावसात दुचाकीस्वरांना उभा राहावे लागत आहे.

हिंजवडी आयटी पार्क आणि ट्रॅफिक हे समीकरण तसे जुनेच आहे. दररोज लाखो आयटीएन्स या मार्गाने प्रवास करतात. याच बरोबर स्थानिकांची मोठी वर्दळ असते. लाखो आयटीएन्स सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी निघतात आणि वाकड पासून त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हिंजवडी गावातील रस्ते अपुरे पडत असल्याने मोठी कोंडी होते. मात्र काही रस्ते झाल्याने काही महिन्यांपूर्वी पासून वाहतूक कोंडी कमी होत होती.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b559725-88ce-11e8-9e0e-9f28bf80c938′]

दरम्यान, वाहतूक शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमाप्रमाणे बदल्या झाल्या. जुने अधिकारी बदलून गेले. तसे हिंजवडी परिसरातील वाहतुक कोंडी सोडवणे किंवा कमी करणे हे मोठे आवाहन वाहतूक पोलिसांवर असते. मात्र हिंजवडी वाहतूक शाखेचे दत्तात्रय पाटील यांना काहीसे यश आले होते. त्यांची बदली झाली आणि नवीन अधिकारी त्या ठिकाणी आले. नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे नवीन बदल करण्यास सुरुवात केली. सोमवारी सकाळी हिंजवडीतील मुख्य असणाऱ्या शिवाजी चौकात वाकडहुन सरळ मारुंजीकडे जाणारी वाहतूक बंद केली. या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक शिवाजी चौकातून वळवून विप्रो चौकातून वळवली. अचानक केलेल्या बदलामुळे चालकांची तारांबळ उडाली.

सोमवारी सकाळ पासूनच पावसाने रिमझिम सुरू केली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांची दैना उडाली. त्यातच वाकड भुजबळ चौक ते शिवाजी चौक एवढ्या लांब मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने आणखीनच भर पडली. दुचाकीस्वार पावसात भिजत उभे होते. भुजबळ चौक ते शिवाजी चौक दुपारी साडेबारा प्रयत्न ठप्प होता. दुपारी साडेबारा होऊनही कार्यालयात न पोहचल्याने आयटीएन्स नाराज होते. दर सकाळच्या वेळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचीही तीच अवस्था होती.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3aeb0048-88ce-11e8-b01b-2f60bcf57d21′][amazon_link asins=’B07D11MDBS’

template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d1bcd31-88ce-11e8-a247-13ba15c47a1c’]