Hip Fracture | शाकाहारी महिलांसाठी जास्त असू शकते हिप फ्रॅक्चरची जोखिम, जाणून घ्या का?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hip Fracture | लीड्स यूनिव्हर्सिटी, यूकेच्या संशोधकांनी 35 ते 69 वयोगटातील 26,000 हून जास्त महिलांच्या डेटाचा अभ्यास केला. जो 22 वर्षांच्या कालावधीत गोळा केला होता. यात असे आढळून आले की शाकाहारी महिलांना नियमित मांस खाणार्‍यांपेक्षा हिप फ्रॅक्चर (Hip Fracture) होण्याची शक्यता एक तृतीयांश जास्त असते. या संशोधनाचे सदस्य ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. डेव्हिड गेयर यांनी हे निष्कर्ष आश्चर्यकारक असल्याचे मत व्यक्त केले. (Hip Fracture)

 

विश्लेषणामध्ये इतर घटक देखील विचारात घेतले जे हिप फ्रॅक्चरच्या जोखमीवर परिणाम करू शकतात. यामध्ये वय, मद्यपान, धूम्रपान, व्यायामाच्या सवयी, रजोनिवृत्तीची स्थिती आणि सामाजिक आर्थिक स्थिती यांचा समावेश होतो.

 

2020 च्या एका अभ्यासात असे दिसून आले की मांसाहार करणार्‍यांपेक्षा शाकाहारी लोकांना (स्त्री आणि पुरुष दोन्ही) हिप फ्रॅक्चरचा धोका 25% जास्त आहे. त्याचप्रमाणे, 2021 मध्ये यूएस अभ्यासात असे दिसून आले आहे की शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांपेक्षा हिप फ्रॅक्चरचा धोका 17% जास्त आहे. (Hip Fracture)

 

शाकाहारी लोकांचा बीएमआय कमी
लीड्स विद्यापीठातील न्यूट्रिशन एपिडेमियोलॉजी ग्रुपचे प्रमुख लेखक आणि संशोधक जेम्स वेबस्टर यांनी सांगितले की, या अभ्यासातून असे दिसून आले की शाकाहारी लोकांचा बीएमआय सरासरी कमी असतो. कमी वजन किंवा जास्त वजनामुळे हाडे आणि स्नायूंचे आरोग्य खराब होते. त्यामुळे हिप फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो. वेबस्टर म्हणाले की शाकाहारी लोकांमध्ये देखील पोषकतत्वांची कमतरता असू शकते.

पोषक तत्वांची कमतरता हे कारण
वेबस्टर म्हणतात, मांस आणि मासे हाडांच्या आरोग्याशी संबंधित अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करतात. जसे की प्रोटीन, व्हिटॅमिन बी12 आणि डी, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, फॉस्फरस, झिंक. मात्र या पोषकतत्वांपैकी बहुतेक वनस्पती, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांपासून मिळवणे शक्य आहे. शाकाहारी लोकांमध्ये या पोषक तत्वांची कमतरता दिसून आली.

 

संशोधकांना असे आढळून आले की शाकाहारी लोक कमी प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी 12 घेतात. त्यामुळे त्यांना नियमित मांस खाणार्‍यांपेक्षा कमी प्रोटीन मिळतात.

 

हिप फ्रॅक्चर टाळण्यासाठी उपाय
वेबस्टर यांनी प्रतिबंधात्मक उपाय सुचविताना म्हटले की, शाकाहारींनी मांस आणि मासे खाणे सुरू करण्याची गरज नाही.
परंतु त्यांनी पौष्टिकदृष्ट्या संतुलित आहार घेतला पाहिजे. आहारासह इतर अनेक घटक हिप फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात,
जसे की धूम्रपान टाळणे आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे. तसेच नियमित व्यायाम करणे.
प्रतिरोधक व्यायाम (जसे की वेटलिफ्टिंग) फायदेशीर ठरू शकतो, कारण यामुळेहाडे आणि स्नायूंची ताकद वाढते.

 

शाकाहारी आहार चांगला असू शकतो. परंतु हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तो हिप फ्रॅक्चरचा धोका वाढवू शकतो.
हा धोका कमी करण्यासाठी संतुलित वजन राखणे, संतुलित आहार घेणे आणि सक्रिय राहणे आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hip Fracture | according to this study vegan women are more prone to hip fracture

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil |  पुरुष आणि महिलांमधील विषमता दूर करण्यासाठी कायद्याची गरज – चंद्रकांत पाटील

Pune Chandani Chowk | चांदणी चौकातील कामाला प्रशासनाकडून गती, सेवारस्त्यासाठी 5 मिळकतींचे भूसंपादन

NCP MP Supriya Sule |  सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रबोधनकार ठाकरेंचा के.सी. ठाकरे उल्लेख, मनसे नेते संतप्त