जर ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहित नसेल तर…, तृतीयपंथीयानं निलेश राणेंना सुनावलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या विरोधकांवर टीकांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निलेश राणे यांनी खालच्या पातळीवरच जाऊन टीका केली आहे. एवढेच नाही तर ट्वीट करत त्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख केला. यावरुन तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना सुनावले आहे.

‘हिजडा’ या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगावा दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेले हलगट सैरवैरा पळते, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे. निलेश राणे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांवर कडाडून टीका करत आहे. यातूनच त्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. तृतीयपंथीयांचा अपमान केल्यामुळे सारंग पुणेकर यांनी त्यांना सुनावले आहे.

वंचित, दुर्लक्षित व समाजाने नेहमीच अन्याय केलेला तृतीयपंथी वर्ग आहे. समाज कंटकांकडून तृतीयपंथियांना कायम हिणवले जाते. मात्र, माजी खासदार निलेश राणे यांनीही तृतीयपंथियांना हिणवणे चुकीचे असल्याचे पुणेकर यांनी सांगितले आहे.