मोदी सरकारसाठी चांगली बातमी ! इतर देशांपेक्षा भारतात मोठ्या प्रमाणात होतेय भरती, अहवालात खुलासा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना साथीमुळे जगभरातील व्यवसारावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे मोठ्या संख्यने लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. कर्मचार्‍यांना पगाराशिवाय रजेवर पाठविण्यात आले. सर्व क्षेत्रात भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, इतर अनेक देशांपेक्षा भारतात कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करीत आहेत. एका अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत जॉब पोस्टिंगचा ट्रेंड मागील वर्षाच्या धर्तीवर होता. मार्चच्या उत्तरार्धपासून मंदी दिसून आली. एप्रिल आणि जून दरम्यान ती वाढली. यामुळे हे सूचित होते की, लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

अहवालानुसार, जूनच्या मध्यापर्यंत, इनडिड इंडियावर जॉब पोस्टिंगमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 51 टक्क्यांची घसरण झाली, ती ब्रिटनमध्ये 60 टक्के आणि युरोपच्या इतर काही देशांमध्ये 61 टक्के होती.

या देशांची नोंद भारतापेक्षा चांगली
दरम्यान, बर्‍याच देशांची नोंद भारतापेक्षा चांगली होती. यामध्ये अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. अमेरिकेत जॉब पोस्टिंगमध्ये 29 टक्के घट झाली असून सिंगापूरमध्ये ती 32 टक्के तर ऑस्ट्रेलियामध्ये 42 टक्के होती.

या क्षेत्रांतील लोकांना मिळाला अधिक रोजगार
हा अहवाल फेब्रुवारी ते मे या कालावधीत इंडेड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीवर आधारित आहे. त्याच वेळी, जगभरातील कोविड -19 साथीने अर्थव्यवस्थेत समस्या निर्माण करण्यास सुरवात केली. कोविड -19 चा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळ्या प्रकारे दिसून आला आहे. सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, वैद्यकीय व्यावसायिक आणि विपणन यासाठी भरती वाढली आहे.