‘हर्सुटीजम’ म्हणजे काय ? जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

काय आहे हर्सुटीजम ?

जेव्हा महिलांमध्ये अतिरीक्त केसांची वाढ होते तेव्हा त्या स्थितीला हर्सुटीजम म्हणतात. हे कोणत्याही वयाच्या महिलांमध्ये होऊ शकतं. यामुळं सामाजिक, मानसिक आणि आत्मविश्वासात कमी असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तसं तर ही स्थिती सामान्य आहे.

काय आहेत याची लक्षणं ?

महिलांमध्ये पुरुषांप्रमाणे केसांची वाढ होणं हे याचं प्रमुख लक्षण आहे. या स्थितीत पुढील काही भागातही केसांची वाढ होते.

– ओठांच्या वरचा भाग
– कल्ले
– हनुवटी
– निप्पल्सच्या बाजूचा भाग
– पोटाच्या खालचा भाग

इतर काही सामान्य लक्षणं पुढीलप्रमाणे –

– तेलकट त्वचा
– कपाळावर टक्कल पडणं
– मुरूम
– अनियमित मासिक पाळी
– मोठा आवाज
– क्लीटोरीस मध्ये बदल
– वंध्यत्व
– काही केसेसमध्ये पाठीचा वरचा भाग, छातीचा मधला भाग आणि पूर्ण पोटचा किंवा वरच्या भागावर केसांची वाढ होते.

काय आहेत याची कारणं ?

– महिलांमध्ये अँड्रेजनची अतिरीक्त पातळी हे हर्सुटीजमचं मुख्य कारण आहे.
– पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस)
– लठ्ठपणा
– रजोनिवृत्ती आणि त्याच्याशी संबंधित हार्मोनचे असंतुलन
– औषधं
– अ‍ॅड्रेनल हायपरप्लेसिया
– कशिंग सिंड्रोम
– थायरॉईड काम न करणे

काय आहेत यावरील उपचार ?

ज्या महिलांमध्ये जास्तीचे केस आले आहेत ते खालील सौंदर्यवर्धक पद्धतींचा वापर करू शकतात.

– ब्लिचिंग
– शेविंग
– व्हॅक्सिंग
– प्लकिंग
– इलेक्ट्रोलिसीस
– नको असलेले केस काढून टाकणारं औषध
– लेजर पद्धती

इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन असणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या अँड्रोजन हार्मोनचा परिणाम कमी करतात आणि त्याची प्रगती कमी होते.

काही गंभीर आणि मध्यम रुग्णांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर अँटी अँड्रोजनचा वापर करू शकतात. काही इतर पर्याय पुढीलप्रमाणे-

– एफ्लोर्निथिन क्रीम
– सायप्रोटेरोन ऐसिटेट
– फ्लूटामाईड
– फिनॅस्टरीड