MNS Chief Raj Thackeray | ‘यांचं अस्तित्व नरेंद्र मोदीमुळे, यांना कोण ओळखतं’, राज ठाकरेंचा आशिष शेलारांना नाव न घेता टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही माणसं असून त्यांचे अस्तित्व नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर अवलंबून असल्याची बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी कर्नाटकात काँग्रेसला (Congress) मिळालेल्या यशाला ‘भारत जोडो यात्रे’चा (Bharat Jodo Yatra) मोठा प्रभाव असल्याचे म्हटले होते. यावरुन शेलार यांनी राज ठाकरेंवर (MNS Chief Raj Thackeray) टीकास्त्र सोडलं होतं.

कल्याणमध्ये संघटनात्मक बैठकीसाठी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आले होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे यांना आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, किती मोठा विरोधी असला तरी देखील विरोधकांच्या काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election) दिसून आला हे मान्य करावं लागेल. या पराभवातून बोध घ्यावा लागेल. जर त्यातून बोध घ्यायचा नसेल तर त्यांनी आपलं सुरुच ठेवाव. मुळात यांचं अस्तित्व हे नरेंद्र मोदी यांच्यामुळे आहे. यांना खाली कोण ओळखतो, यांचे अस्तित्व मोदींवर अवलंबून आहे. ही लहान माणसे आहेत, असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला.

 

आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका

घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला (BJP) यश आले. मग त्याठिकाणी भारत जोडो यात्रेचा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का? असा सवाल उपस्थित करत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. तसेच राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तत्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

 

Web Title :- ‘His existence is because of Narendra Modi, who knows him’, Raj Thackeray’s Ashish told the Shelar

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘आमच्या पराभवाचं विश्लेषण…’ (व्हिडिओ)

Akola Riots | ‘दंगलीची माहिती पोलिसांना…’, अकोला दंगलीवरुन राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप;
देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी

Chandrakant Patil – Kothrud Pune News | ना आश्वासन, ना तारीख थेट संवाद द्वारे जागेवर निर्णय;
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरुडमधील उपक्रमाचा तिसरा टप्पा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – 3 हजार रूपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून
करणार्‍या कॅब चालकाला अटक; जाणून घ्या मर्डरची स्टोरी