त्याच्या ‘त्या’ हौसेपायी पंढरीतील चोर पाेलीसांच्या जाळ्यात 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चोर तर अनेक असतील परंतु एक वेगळीच घटना इथे समोर आली आहे. समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक मंदिरात येतात. यावेळी चोर त्यांचे दागिने लंपास करतात. असाच एक वेगळा चोर त्याच्याच एका हौसेपायी पोलीसांच्या ताब्यात आला. हा चोर दररोज भाविकांचे दागिने आणि पैशांची चोरी करायचा.
दररोजच हा चोर भाविकांचे दागिने चाेरायचा आणि याची खासियत म्हणजे तो  लंपास केलेला माल ठेवण्यासाठी रोज एक पिशवी घ्यायचा. त्याच्या या हौसेपायीच तो जेरबंद व्हायला मदत झाली. गणेश लोखंडे असे या चोराचे नाव आहे.
पंढरपूरातील विठ्ठल मंदिर परिसर, मुख दर्शन रांग, नामदेव पायरी या भागात दर्शनासाठी मोठी झुंबड उडालेली असती. लोखंडे या गर्दीचा गैऱफायदा घेऊन लोकांना लुबाडायचा. दररोज नवीन पिशवी घेण्याच्या हौसेमुळे हा चोरटा गोत्यात आला आहे.
अशी करायचा चोरी
गणेश लोखंडे रोज सोबत एक पिशवी आणायचा. चोरी करण्यासाठी भाविकांच्या  रांगांमध्ये सहभागी व्हायचा. आणि भाविकांच लक्ष नसताना खिशातील पाकिटे, महिलांच्या पर्स, दागिने चोरायचा. सोबत आणलेल्या नवीन पिशवीत हा मुद्देमाल तो ठेवायचा. यानंतर तो कोणाच्याही नकळत मंदिराच्या बाहेर पडायचा.
असा जाळ्यात आला चोर
नामदेव पायरीजवळ एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची तक्रार आल्यावर मंदिर बंदोबस्तात असलेल्या पोलीस हवालदार यमगर यांनी मंदिरातील cctv फूटेज तपासले.  यात गणेश लोखंडे त्यांना काही संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. मुख्य म्हणजे त्यांना असे आढळून आले की, त्याच्या हातात रोज एक पिशवीही दिसते आहे. याचाही त्यांना संशय आला. यानंतर मात्र त्यांनी त्याच्यावर नजर ठेवण्याचे ठरवले.
त्याच्या नजर ठेवायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यावरील संशय दिवसेंदिवस बळावत गेला. यानंतर पोलीसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय तो भाविकांचे  पर्स, पाकिटे आणि दागिने चोरत असतो असेही सांगितले. यानंतर  चोरी केलेली रक्कम आणि दागिन्यांचा तपास सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले शिवाय पोलिसांनी त्याच्याकडे असलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त केलेला आहे.
अजून सहा चोरटे ताब्यात
लोखंडेला पकडल्यानंतर आणखी सहा चोरटे पोलीसांच्या ताब्यात येण्यास मदत झाली, जे  विठ्ठल मंदिरात चोरी करायचे. असेही सांगितले जात आहे की, या चोऱ्यांमागे टाेळ्यांचा हात असावा. त्यामुळे आता लोखंडे आणि इतर चोरांकडे चौकशी केल्यानंतर मंदिर परिसरात चोरी करणाऱ्या टोळ्यांची माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us