मित्रासोबत गाडीमध्ये दिसली पत्नी, टोल नाक्यावर पाहून पतीनं बदडलं

पंचकुला (चंदन) : एका महिलेला तिच्या पतीने टोल-प्लाझावर बेदम मारहाण केली आणि नंतर तिला गाडीत घालून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती या महिलेने कुटुंबियांना दिली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंडीमंदीर पोलीस ठाण्यात महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ती पंचकुलाच्या एका सरकारी कार्यालयात काम करते. तिचा पती पंजाबच्या को ऑपरेटीव्ह सोसायटीत निरीक्षक पदावर कार्यरत आहे.

ही महिला २० डिसेंबररोजी तिच्या मित्रासोबत दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पिजोरीकडे कारने निघाली होती. जेव्हा हे दोघे टोल प्लाझावर पोहोचले, तिचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी दोघांवर हल्ला केला. तसेच तिला कारमध्ये जबरदस्तीने बसूवन तिचे अपहरण केले.

बॅग पळविल्याचा आरोप
यावेळी महिलेने घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. आरोपींनी महिलेची बॅगसुद्धा हिसकावून घेतली. यामध्ये एक सोन्याची चेन, दहा हजार रूपये आणि काही कागदपत्र होते. माहिती मिळाल्यानंतर महिलेचे कुटुंबिय पोहोचले आणि त्यांनी महिलेल्या आपल्यासोबत घेतले. याप्रकरणी चंडीमदिर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/