6 नवीन ‘मेड इन इंडिया’ SmartTV लाँच, किंमत 11,990 रुपयांपासून सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिव्हिजन निर्माता कंपनी हिसेन्सने भारतात 6 नवीन ‘मेड इन इंडिया’ टीव्ही लाँच केले आहेत. त्यांची किंमत 11,990 रुपयांपासून सुरु होऊन 33,990 रुपयांपर्यंत आहे. ग्राहक यांना अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, टाटाक्लिक आणि रिलायन्स डिजिटल सारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन विकत घेऊ शकतात. 6 ऑगस्टपासून त्यांची विक्री सुरू होईल. या 6 अल्ट्रा-एचडी आणि अँड्रॉइड टीव्ही व्यतिरिक्त, कंपनी लवकरच आणखी तीन मॉडेल्स आणू शकते. विशेष म्हणजे 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान कंपनी आपल्या टीव्हीवर 5 वर्षाची पॅनेल वॉरंटी देत आहे.

कोणत्या मॉडेलची किती किंमत
कंपनीने Hisense A71F सीरीज अंतर्गत तीन 4K डिस्प्ले आणि Hisense A56E सीरीज अंतर्गत तीन फुल-एचडी डिस्प्ले असणाऱ्या टीव्ही लाँच केल्या आहेत. 32 इंचाच्या फुल-एचडी टीव्हीची किंमत 11,990 रुपये आहे, 40 इंचाच्या फुल-एचडी टीव्हीची किंमत 18,990 रुपये आहे आणि 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 20,990 रुपये आहे. त्याचबरोबर 4 के सीरीजमध्ये 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 24,990 रुपये आहे, 50 इंचाच्या मॉडेलची किंमत 29,990 रुपये आहे आणि 55 इंचाच्या मॉडेलची किंमत 33,990 रुपये आहे.

कोणती खास वैशिष्ट्ये आहेत
Hisense 4K टीव्ही पॅनेलमध्ये डॉल्बी व्हिजन एचडीआर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे पिक्चर क्वालिटी चांगली देते. त्याच वेळी अधिक चांगल्या आवाजासाठी डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट मिळतो. वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल बँड Wi-Fi सपोर्ट देण्यात आला आहे. सर्व टीव्ही अँड्रॉइड टीव्ही 9.0 वर काम करतात आणि गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोअरसह येतात. यात बिल्ट-इन क्रोमकास्ट आणि व्हॉइस वर काम करणारे रिमोट देण्यात आले आहे. विशेष गोष्ट अशी आहे की त्यांच्यासह आपण ब्लूटूथ हेडफोन्स देखील कनेक्ट करू शकता. 4K टीव्ही रँडमध्ये बेझल-लेस डिझाइन देण्यात आले आहे आणि हे अल्ट्रा-डिमिंग तंत्रज्ञानासह येतात. 32 इंचाच्या या मॉडेलमध्ये 20 वॅटचे स्पीकर्स, 43 इंचाच्या मॉडेलमध्ये 24 वॅटचे स्पीकर्स, 50 इंचाच्या आणि त्यापेक्षा जास्त मॉडेलमध्ये 30 वॅट साऊंड आउटपुट मिळेल.