CST रेल्वे स्थानक खासगी कंपनीच्या ताब्यात जाणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील सर्वात मोठं आणि भव्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आता खासगी कंपन्यांच्या हाती जाणार आहे. रेल्वे मंत्रालयानं स्थानकाच्या डेव्हलपमेंटसाठी टेंडर मागवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जागतिक वारशात समाविष्ट असलेल्या आणि मुंबईतील सर्वात मोठं आणि भव्य रेल्वे स्थानक आहे. CSMT रेल्वे स्थानकाच्या कमर्शिल डेव्हलपमेंटसाठी 60 वर्षे आणि रेसिडेंशियल डेव्हलपमेंटसाठी 90 वर्षांच्या भाडेतत्वावर खासगी कंपनीला देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रलायनं घेतला आहे. सध्या देशातील इतर राज्यातील काही रेल्वे स्थानकं खासगी कंपन्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाची इमारत ही आपल्या भव्यतेमुळं देशभरातील नागरिकांमध्ये आकर्षणाचा केंद्र आहे. PPPAC नं या स्थानकाच्या खासगीकरणाच्या योजनेला आधीच मुंजरी दिली होती. आता यासाठी बोली प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या कंपनीला हे काम मिळेल त्यांना स्थानकाच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी दिली जाईल. सोबत आजूबाजूची रेल्वे जमीनही मिळेल ज्यावर व्यावसायिक आणि अनिवासी बांधकाम केलं जाईल असं रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

CSMT या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वे स्थानकाची निर्मिती 1887 साली व्हिक्टोरिया टर्मिनस या नावानं करण्यात आली होती. त्या काळी याच्या निर्मितीसाठी 16.13 लाख रुपये एवढा खर्चा आला होता. भारतीय वास्तुकलेचा विचार करूनच या स्टेशनच्या इमारतीची रचना करण्यात आली होती. इंग्रजीतील सी अक्षराच्या आकारात योजनाबद्ध पूर्वेकडून पश्चिम दिशेनं या इमारतीची निर्मिती केली गेली होती. या इमारतीचं केंद्र त्याचं मुख्य आकर्षण आहे. या वास्तूचं वैभव लक्षात घेऊन 2004 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात याचा समावेश करण्यात आला होता. ब्रिटनमधील अनेक रेल्वे स्थानकांशी मुळतं जुळतं असं या स्थानकाचं डिझाईन आहे. व्हिक्टोरिया आणि मुघलकालीन आर्किटेक्चरचा प्रभाव यावर दिसत आहे.