राज्यसभेचा ऐतिहासिक दिवस, साडेतीन तासातच पास झाले 7 विधेयक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवार 22 डिसेंबर हा दिवस राज्यसभेतील सर्वात महत्वपूर्ण दिवस म्हणून नोंदवला गेला. वरिष्ठ सभागृहात मंगळवारी साडेतीन तासात तब्बल सात विधेयके पास करण्यात आली. यामध्ये ज्वारी, डाळी, तीळ, खाद्यतेल, बटाटा आणि कांदा यांना आवश्यक वस्तूंच्या यादीतीतून वगळण्यात आलं आहे. सभागृहातील आठ सदस्यांच्या निलांबनानंतर अधिक तर सदस्यांनी सभागृहाच्या कार्यवाहिवर बहिष्कार टाकला. लोकसभेत हे बिल आधीच पास झाले आहेत.

काँग्रेस, टीएमसी, सपा, एनसीपीच्या सदस्यांनी बहिष्कारामुळे या चर्चेत भाग घेतला नाही. या विधेयकाच्या चर्चेत फक्त भाजप, जेडीयू तसेच अन्नद्रमुक, बिजू जनता दल, टीडीपीच्या सदस्यांनी भाग घेतला आणि मोदी सरकारचं समर्थन केलं. अधिकतर बिलांवर सदस्यांची भागीदारी खूप कमी होती आणि उत्तरं देखील संक्षिप्त रुपात देण्यात आली. विधेयके पास करण्यासाठी राज्यसभेच्या कार्यवाहिचा वेळ एका तासाने वाढवण्यात आला होता.

ही सात विधेयके पारित

– भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान विधी बिल 2020.

– आवश्यक वस्तू बिल 2020.

– बँक नियमन संशोधन बिल 2020.

– कंपनी संशोधन विधेयक 2020.

– नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेज युनिव्हर्सिटी बिल 2020.

– राष्ट्रीय सुरक्षा युनिव्हर्सिटी बिल 2020.

– कर आणि अन्य कायदा बिल 2020.