सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय ! सासू-सासर्‍यांच्या घरात सुनेला देखील राहण्याचा अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार सुनेला पतीच्या आई- वडीलांच्या म्हणजेच सासू- सास-यांच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज हा महत्वपूर्ण आणि ऐतिसाहिक निर्णय दिला आहे.

न्यायाधीस अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पॅनलने तरुण बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांचा निर्णय बदलला आहे. न्यायालयाच्या या निणर्यामुळे पीडीत महिलांना दिलासा मिळणार आहे.

कायद्यानुसार महिला तिच्या पतीच्या आई- वडीलांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये राहू शकत नाही, असे बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या बेंचने म्हणले होते. आता तीन सदस्यीय बेंचने बत्रा प्रकरणातील निणर्य बदलत काही प्रश्नांचे उत्तर दिले आहे. पतीच्या विविध मालमत्तेतच नाही तर सामायिक घरात देखील मुलीचा हक्क राहणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.