USA ला ICC कडून एकदिवसीय संघाचा दर्जा ; मराठमोळ्या कर्णधाराचा मोलाचा वाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – USA च्या क्रिकेट संघासाठी बुधवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. अमेरिकेच्या या संघाला बुधवारी ICC कडून एकदिवसीय संघाचा दर्जा प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे यात कर्णधार असलेल्या मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरचा मोठा हात आहे. या स्पर्धेतील सामन्यात अमेरिकेने हॉंगकॉंग संघाला ८४ धावांनी पराभूत केले. कर्णधार सौरभ नेत्रावळकर याने सामन्यात ५ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि १ बळी घेतला. त्याच्या नेतृत्वाच्या कौशल्यामुळे अमेरिकेला प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय संघाचा दर्जा मिळाला.

यावेळी अमेरिकेच्या संघाने ८ बाद २८० धावांचा डोंगर उभा केला.सलामीवीर झेव्हियर मार्शल याने दमदार शतक ठोकले. १५४ चेंडूत त्याने १०० धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. याशिवाय स्टीव्हन टेलर याने ८८ धावांची खेळी केली. त्यानेही ७ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली. या दोघांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना फारशी छाप पाडली नाही. त्यामुळे अमेरिकेला ८ बाद २८० धावांपर्यंतच मजल मारता आली.

या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगला ८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा किंचित शाह याने सर्वाधिक ५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार लगावले. एजाज खान आणि एहसान खान या २ फलंदाजांनी ८ व्या विकेटसाठी नाबाद ६६ धावांची भागीदारी केली. पण हे दोघे मिळून हाँग काँगला केवळ ७ बाद १९६ धावांपर्यंत मजल मारून देऊ शकले.

याबाबत बोलताना आम्ही केलेल्या कामगिरीवर आम्हाला आभिमान आहे. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवला म्हणूनच आम्ही संघ म्हणून उत्तम कामगिरी करू शकलो”, असे मत सौरभने व्यक्त केले