लोकशाही भक्कम करण्यासाठी इतिहास महत्वाचा – प्रा.डॉ. अश्पाक शिकलगर

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जनतेचे जात धर्म आणि राजकारणासाठी आपापसात भांडण लावणारा खरा रयतेचा राजा नसतो .  लोकशाहीत हे घडायला नको तरच शिवशाहीचा आदर्श घेतला असे म्हणता येईल असे प्रतिपादन प्रा.डॉ. अश्पाक शिकलगर यांनी केले.

सर्वधर्म संघातर्फे येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात शिवजयंती निमित्त आयोजित लोकशाही आणि स्वराज्य या विषयावर प्रा.डॉ. शिकलगर यांचे व्याख्यान झाले. प्रा.डॉ. विजयचंद्र जाधव अध्यक्ष होते. प्रारंभी शाहीद जवानांना श्रध्दांजली देण्यात आली. प्रकाश ठोंबरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. प्राचार्य कृष्णा पोतदार, हुसेन गुरुजी, मुरलीधर पांडे, प्रा डॉ. पुनम वानखेडे, प्रा डॉ दीपक बाविस्कर आदी उपस्थित होते.

प्रा डॉ शिकलगर पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील लोकशाही भक्कम करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुशासन अंगीकारले पाहिजे. शिवकाळात स्त्रीयांचा आदर, दर्जा राखला जात होता त्या काळी आदर्श आरमार होते. आज लोकशाही भक्कम करायची असेल तर शिवशाही आणि वर्तमान याची योग्य सांगड घातली पाहिजे. स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना जनतेने दूर केले.आई जिजाऊंच्या मनात स्वराज्य संकल्पना स्पष्ट होती. भौतिक गुलामी झूगारून लोकशाही रुजवावी पुरोगामी विचारांचा खऱ्या अर्थाने पुरस्कार करावा असे मत प्रा डॉ शिकलगर यांनी मांडले.

प्रा.डॉ.जाधव यांनी खरी लोकशाही शिवशाहीत होती.आज देशात संख्यात्मक बळ दिसत असले, तरी लोकशाहीच्या दृष्टीने गुणात्मक बदल आवश्यक आहे .असे मत मांडले. हुसेन गुरूजी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. पोतदार यांनी आभार मानले.
Loading...
You might also like