11 मार्चचा इतिहास : मोठ्या विध्वंसाचा दिवस, जाणून घ्या

नवी दिल्ली : इतिहासात 11 मार्च या तारखेला ज्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. त्यामध्ये जपानमध्ये आलेला भीषण भूकंप आणि त्यानंतर समुद्रातून उसळलेली भयंकर त्सुनामी ही प्रमुख उदाहरणे आहेत. तो 11 मार्च 2011 चा दिवस होता, जेव्हा जपानमध्ये प्रशांत महासागराच्या किनार्‍यावर तोहोकूजवळ समुद्रात 9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भीषण भूकंपानंतर त्सुनामीने भयंकर विध्वंस केला आणि 15 हजारपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूसह संपत्तीचे प्रचंड नुकसान केले. हा जपानच्या इतिहासातील सर्वात मोठा शक्तीशाली भूकंप होता.

या दिवसाच्या इतर घटनांबाबत बोलायचे तर 1881 मध्ये 11 मार्चला कोलकाताच्या टाऊन हॉलमध्ये रामनाथ टागोर यांची प्रतिमा लावण्यात आली. एखाद्या भारतीयाची प्रतिमा सार्वजनिक ठिकाणी लावण्याची ही पहिली वेळ होती. 1948 मध्ये 11 मार्चला देशाच्या पहिले अधुनिक जहाज जलऊषाचे विशाखापट्टणम बंदरात जलावतरण करण्यात आले.

1689 :
मोघल बादशाह औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय वेदना देऊन मारले.

1881
कोलकाता टाऊन हाऊलमध्ये रामनाथ टागोर यांची प्रतिमा लावण्यात आली.

1948 :
देशाचे पहिले जहाज जलऊषाचे विशाखापट्टणममध्ये जलावतरण.

1985 :
कोन्स्तातींन चेरेन्कोच्या मृत्यूनंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांना सोव्हिएत संघाचा सर्वोच्च नेता निवडण्यात आले.

1990 :
संसदेत मतदानानंतर लिथुआनियाने स्वताला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र घोषित केले. असे करणारे हे पाहिले सोव्हिएत गणराज्य होते.

1996 :
इराणने सॅटेनिक व्हर्सेय पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्याविरूद्ध जारी केलेला फतवा मागे घेतला.

2004 :
स्पेनमध्ये तीन रेल्वे स्थानकांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात 190 लोकांचा मृत्यू झाला, तर 1200 लोक जखमी झाले.

2008 :
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले यान एंडेव्हियरला आपल्या अंतराळ स्थानकाकडे रवाना केले.

2011 :
भारताने 350 किलोमीटर दूरपर्यंत निशाना साधणारे क्षेपणास्त्र धनुष आणि पृथ्वीची यशस्वी चाचणी केली.

2011 :
जापानमध्ये प्रशांत महासागराच्या किनार्‍यावर तोहोकूजवळ समुद्रात 9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीत प्रचंड विध्वंसामुळे 15 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.