मानाच्या पहिल्या ‘कसबा’ गणपतीचा इतिहास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याला गणपतीचं शहर म्हटलं जातं. पुण्यातील गणेशोस्तव हा जग प्रसिद्ध असतो. गणेश मिरवणुका, ढोल- ताशा पथके सगळं काही आकर्षक असतं. त्यातील सर्वात जास्त आकर्षण असते ते मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक. त्यातील पहिला मनाचा गणपती म्हणजे कसबा पेठेतील कसबा गणपती. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

Image result for kasba ganpati

कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने या कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. या मागे देखील एक आख्यायिका आहे, राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली.

Image result for kasba ganpati

या गणपतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती एका दगडी गाभार्‍यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत.

Image result for kasba ganpati

शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ‘जयति गणपति’ असे म्हणतात. आजही पुण्यात घरात होणार्‍या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात.

Image result for kasba ganpati

यंदाचा गणेशोत्सव :
या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. जुन्या काळी गणपतीचे कार्यक्रम शनिवारवाड्यात होत होते. यंदा ह्या कसबा गणपती मंडळाचे १२७ वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्याकडे मंडळचा कल असणार आहे. कसबा मंडळ यंदा गणेश महालाच्या प्रतिकृती तयार करून गणपतीची स्थापना करणार आहे. तसेच नदी सुधार योजने अंतर्गत संपूर्ण मानाच्या मंडळांनी एकत्रित घेतलेल्या निर्णयाप्रमाणे या वर्षी देखील गणपतीचे विसर्जन हे हौदात करण्यात येणार आहे. मुळा -मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –