पुण्यातील मानाच्या गणपतींचा इतिहास आणि विसर्जन मिरवणुक, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –
1) मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती
कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. कसबा पेठेत असणारा हा गणपती पेशवेकालीन असून त्याचे मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती साडेतीन फूट उंचीची आहे. आधी ती खूप लहान होती मात्र शेंदूर लेपून ती मोठी करण्यात आली आहे. 1636 मध्ये शहाजी राजांनी लालमहाल बांधला त्यावेळी त्याच्याच बाजूला जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो.
पुण्यामध्ये पहिल्यांदा जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यानंतर पुढच्याच वर्षी मिरवणुकी दरम्यान कोणाचा गणपती पुढे असावा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्वत: लोकमान्य टिळक यांनी कसबा गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहे, म्हणून त्याला अग्रक्रम देण्याचा निर्णय घेतला.
2) मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही 1893 पासून प्रारंभ झाला. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतींचे आणि पुण्यातील इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही. मात्र या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि त्यानंतर दरवर्षी नव्या मूर्तीची स्थापना होते.
3) मानाचा तिसरा गणपती : गुरुजी तालीम गणपती
हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला 1887 मधेच सुरुवात झाली. याठिकाणी असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरुवात झाली. मात्र आता ही तालीम अस्तित्वात नाही. या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली अशी आहे.
4) मानाचा चौथा गणपती : तुळशीबाग गणपती
दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. तुळशीबाग या खरेदीच्या ठिकाणी मध्यभागी याची स्थापना होते.
5) मानाचा पाचवा गणपती : केसरी वाडा गणपती
केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. 1998 मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडवरुन जाते. मात्र केसरी वाड्याचा गणपती केळकर रोडवरुन जाऊन विसर्जित होतो.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा