मंडईतील शारदा-गजाननाचा इतिहास !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात अनेक गणपती मंडळे असून यामध्ये पाच मानाचे आणि महत्वाचे गणपती असून यामध्ये श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग गणपती, श्री केसरी गणपती यांचा समावेश होतो. त्याचबरोबर मंडईतील शारदा गजाननाची मुर्ती असलेला गणपती देखील लोकप्रिय असून या गणपतीची स्थापना 1894 मध्ये करण्यात आली आहे.

Image result for sharda gajanan

गणपतीचा इतिहास

या गणपतीच्या इतिहासाबाबत सांगितले जाते कि, पहिलवान लक्ष्मण डोंगरे काची यांना मुलबाळ होत नव्हते म्हणून त्यांनी महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानीला साकडे घातले.  मूल झाल्यास या मंदिरातील होमकुंडाच्या वर असलेल्या शारदा गणपतीच्या मूर्तीची स्थापना करेल असा नवस त्यांनी बोलला. त्यानंतर त्यांना मूल झाल्याने त्यांनी नवस फेडण्यासाठी 1894 मध्ये या मूर्तीची स्थापना केली. त्यावेळी हि मूर्ती कागदाचा लगदा, भुसा, माती, गवत, रांझा यांपासून बनविण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच हि मूर्ती इकोफ्रेंडली आहे.

त्यावेळी या मूर्तीची मिरवणूक हि डोक्यावरून काढली जात असे. त्याचबरोबर हा गणपती बारा बलुतेदारांचा गणपती म्हणून ओळखला जात असे. या परिसरात हे सर्व जण व्यापार करत असल्याने या गणपतीला व्यापाऱ्यांचा गणपती देखील म्हटले जात असे. त्यानंतर 1910-20 मध्ये या ठिकाणी नवीन मूर्ती स्थापन करण्यात आली. दोन्ही मूर्तींची एकत्रित मिरवणूक काढून जुनी मूर्ती विसर्जित करायची आणि नवीन मूर्ती तशीच ठेवायची असे ठरवण्यात आले, मात्र ऐन वेळी पाऊस आल्याने नवीन मूर्ती खराब झाली. त्यामुळे नवीनच मूर्ती विसर्जित करण्यात आली, असेदेखील सांगण्यात येते. त्यामुळे दरवर्षी उत्सवात हीच जुनी मूर्ती वापरण्यात येते.

Image result for sharda gajanan

मंडळाबाबत माहिती

या मंडळाचा सर्वाधिक भर हा देखाव्यावर नसून धार्मिक कार्यांवर असतो. या मंडळाची आळंदीला एक धर्मशाळा देखील असून यामार्फत समाजसेवा केली जाते. शारदा गजाननाची मूर्ती हि उजव्या सोंडेची असून भाविकांना या मूर्तीला स्पर्श करून दिला जात नाही. मात्र भाविकांना नीट दर्शन मिळावे यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली असते. मंडळाच्या मार्फत अनेक पर्यावरणपूर्वक उपक्रम देखील राबवले जातात. त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना 10 रुपयांत पोटभर जेवण मिळण्याची देखील सोय या मंडळामार्फत करण्यात येते. त्याचबरोबर पुणे बोर्डिंग हाउसच्या गरीब मुलांचा पाच वर्षांचा खर्च देखील मंडळाच्या वतीने करण्यात येतो.

या मंडळाचे कार्य हे मोठ्या प्रमाणात धार्मिक असल्याने गणपती उत्सव काळात अभिषेक, याग, भजन यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत असते. त्याचबरोबर या ठिकाणी निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे देखील अतिशय योग्य अशा खतात रूपांतर केले जाते. अशा या पर्यावरणक पूरक मंडळाच्या वतीने हे कार्य अविरत सुरु असून यापुढेही मोठ्या उत्साहात सुरु राहणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या

You might also like