home page top 1

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात RSSचा इतिहास !

नागपुर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केला आहे. विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच संघाबाबत थेट अभ्यासक्रमात समावेश केला आहे. त्यामुळे याबाबत राष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागपूर विध्यापीठाने नुकतेच नवीन अभ्यासक्रम लागा केला आहे. इतिहास अभ्यास मंडळाने बी.ए पदवी दुसऱ्या वर्षाच्या भारताचा इतिहास १८८५ ते १९४७ या कालखंडाच्या तीसऱ्या घटकात राष्ट्रीय स्वयसेवक संघ राष्ट्र निर्माणातील भुमिका या विषयाचा समावेश केला आहे. या पुस्तकात पहिल्या भागात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना मवाळ राजकारणाचे स्वरुप १८८५ ते १९०५ जहालवाद्यांचा उदय आणि विकास १९०५ ते १९२० तर दुसऱ्या भागात असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चलेजाव चळवळ, या तीन आंदोलनाचा समावेश आहे. तर तिसऱ्या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र निर्माणातील भुमिका, क्रिप्स मिशन कॅबिनेट मिशन योजना, व चौथ्या भागात सुभाषचेद्र बोस, माऊंटबॅटन योजना आणि स्वातंत्र भारताचा कायदा अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

तर नागपुर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर आर,एस,एस संघाचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मानव संसाधन विकासमंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे आदेश दिले होते.

त्यावेळी पुर्ण देशात शिक्षणाचे भगवेकरण करण्यात येत असल्याचा वाद पेटलेला होता. तर आता थेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळामार्फत आर,एस,एस संघाची राष्ट्र निर्माणातील घटक असा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी राजकीय पातळीवर वेगळ्या प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२७ सप्टेंबर १९२५ रोजी आर,एस,एस संघाची स्थापना झाली होती. तेव्हापासुन संघ अव्याहतपणे काम करीत आहे. त्यामुळे बी,ए च्या इतिहासात संघ स्थापनेपासुन स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात झालेल्या वेगवेगळ्या घडामोडी, घटना, यांचा उल्लेख अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. इतिहास अभ्याक्रम मंडळाने नेमके काय घेतले ते पाहावे लागेल. परंतु आर,एस,एस ही संघटना ९५ वर्षापासुन देशात सक्रीय आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आपण इतर संघटनांचा इतिहास वाचतोय तर संघाचा इतिहासही विद्यार्थ्याना समजावा या उद्देशाने अभ्यास मंडळाने निर्णय घेतला असावा, असे शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यानी म्हटले आहे.

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

Loading...
You might also like