राज्य विधीमंडळांचा इतिहास आता एका क्लिकवर येणार, 1937 पासूनच्या कामकाजाचे डिजिटायझेशन, यशवंतराव चव्हाण, अत्रेंची गाजलेली भाषणे मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य विधीमंडळाचा इतिहास आता एका क्लिकवर पाहता येणार आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या आतापर्यंतच्या कामकाजाचे अंकेक्षण ( डिजिटायझेशन ) केले जाणार आहे. त्यामुळे 19 37 पासूनची यशवंतराव चव्हाण, अत्रे यांच्यासह अनेकांची गाजलेली भाषणे अभ्यासकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. राज्यातील राजकीय अभ्यासकांसाठी हा एक खजिनाच आहे. तो उपलब्ध करून घेण्यासाठी मुंबईत येणे, राजकीय परवानग्या घेणे,, असे बरीच दगदग करावी लागत असे. मात्र आता अभ्यासकांचा हा त्रास कमी होणार आहे.

विधीमंडळाच्या विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचे वृतांकन केले जाते. विधानसभा 1937 पासून अस्तित्वात आहे. तेंव्हापासूनच्या कामकाजाचे शब्दांकन ग्रंथ स्वरुपात जतन केले आहे. त्यामुळे विधीमंडळाचे ग्रंथालय म्हणजे राज्याच्या राजकीय परंपरचे समृध्द दालनच आहे. यात यशवंतराव चव्हाण, प्र. के. अत्रे आदीसारख्या दिग्गजांच्या भाषणांचा समावेश आहे. तसेच यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यावेळी दोन्ही सभागृहांनी त्यांना दिलेल्या निरोपाचे वर्णन, कोण काय म्हणाले. याचाही यात समावेश आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोरे, यांनी हा सगळा अनमोल संग्रह अभ्यासकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील विधानभवन सभागृहात बैठक
कोणती आयटी कंपनी हे काम करु शकेल याची माहिती घेतली जात आहे. पुण्यातील विधानभवन सभागृहात याबातची आढावा बैठक झाली. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत तसेच अधिकारी व कर्मचारी बैठकीला उपस्थितहोते. बैठकीत काही कंपन्यानी कामाचे ते कसे करता येईल याचे सादरीकरण केले. याविषयीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे.