पिंपरी : हितेश मूलचंदानी मर्डर केस मध्ये दोन आरोपी अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून हितेश गोवर्धनदास मूलचंदानी (२३, पिंपरी कॅम्प, पुणे) याचा खून झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रांच यूनिट ४ ने बुधवारी रात्री औंध येथील स्पाइसर कॉलेज रोड येथून २ आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेत वापरण्यात आलेली सुमो जीपही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा आणि योगेश विट्ठल टोनपे उर्फ लंगडा असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी राजू मचे यांना या संबधी खबर मिळाली. त्यावर त्यांनी औंध येथील स्पाइसर कॉलेज रोड येथून २ आरोपीना ताब्यात घेतले. गुन्हयात वापरलेली टाटा सुमो हि गाडी ताब्यात घेतली आहे. दोन्ही आरोपींची सांगवी पोलीस स्टेशन मध्ये अट्टल गुन्हेगार म्हणून यापूर्वीच नोंद आहे. पोलीसांची पुढील कायदेशीर प्रकिया सुरु आहे.

मंगळवारी कुणाल हॉटेल समोर झालेल्या क्षुल्लक भांडणातून हितेश याला मारहाण करत जबरदस्तीने गाडीत बसवले आणि पिंपरी चौकात नेले. पिंपरी चिंचवड मनपा भवनच्या मागील वरदहस्त सोसायटीजवळच्या सुनसान रस्त्यावर हितेशचा निर्घृण खून करण्यात आला. कुणाल हॉटेल चे मालक रोहित किशोर सुखेजा (२६, रा. एचबी ब्लॉक, शनि मंदिरा जवळ) यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी अमीन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे), शाहबाज सिराज कुरेशी (कासारवाडी, पुणे), अरबाज शेख (रा. खडकी), अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा आणि योगेश विट्ठल टोनपे उर्फ लंगडा ( दोघेही रा. सांगवी) यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. यांपैकी फरार शाहबाजचा शोध पोलीस घेत आहे. अमीन खान याला पिंपरी पोलिसांनी याआधीच ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर पिंपरी येथील व्यापारी समुदायात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशी द्यावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी कॅम्प येथे ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला. यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या बियर बार आणि हॉटेल्स विरोधात कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –